माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

शिलाँग: भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते. शिलाँग इथं आयआयएमच्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान ते मंचावरच कोसळले, त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या धक्क्यानं संध्याकाळी सातवाजून ५४ मिनीटांनी त्यांचं निधन झालं.

अब्दुल कलाम यांचा अल्प परिचय –

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडूत झाला.

२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ दरम्यान हे भारताचे अकरावे राष्ट्रपती कार्यकाळ
होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *