खरेदीच्या बहाण्याने अालेल्या चाेरट्यांनी लांबवली 90 हजारांची चैन

वडगाव बाजार पेठेत किराणा मालाच्या दुकानात माल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चाेरट्यांनी  दुकानदाराची ९० हजार रुपये किंमतीची तीन तोळे वजन असलेली सोन्याची चैन लंपास केली.
सुरेंद्र सुवालाल बाफना या व्यापा-याने पोलिसांकडे फिर्याद दिली. बाफना यांच्या दुकानात एक जण खरेदीसाठी आला. तीनशे किलो तांदूळ खरेदी केला. दहा दहा किलोचे कट्टे बनविण्यास सांगितले. साखर व तेलाचे डबे घ्यायचे असे सांगितले. आमचे धर्मगुरू थोड्या वेळात येतील.त्यांच्यापुढे  असे कपडे घालून व हातात घड्याळ व  चैन घालून  वस्तू दिलेल्या त्यांना आवडणार नाही. त्यामुळे शर्ट व गळ्यातील चैन काढून ठेवा, असे सांगितले. बाफना यांनी शर्ट काढून त्यात चैन ठेवली.राहिलेले तांदुळाचे कट्टे बनविण्यास सुरवात केली. तोप़र्यंत चोरटा खिशातील चैन घेऊन तेथून पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *