तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. त्यासह, मध्य रेल्वेवर दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी सोमवार मध्यरात्री १ ते पहाटे ६ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत मध्य रेल्वेवर रविवार १२ ऑगस्ट रोजी कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल स. १०.३७ ते दु. ३.५६पर्यंत दिवा आणि परळ स्थानकांमध्ये धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यानंतर या लोकल पुन्हा जलद मार्गावर चालवल्या जातील. या कालावधीत लोकल सेवा किमान २० मिनिटे उशिराने धावतील.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल स. १०.०५ ते दु. ३.२२पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील. सीएसएमटीकडे ये-जा करणाऱ्या लोकल स. ११ ते संध्याकाळी ६पर्यंत १० मिनिटे उशिराने धावतील. मेल, एक्स्प्रेसदेखील सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.रत्नागिरी ते दादर पॅसेंजरला रविवारी दिवा स्थानकात अंतिम थांबा देण्यात येईल. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकाहून सुटेल. या प्रवाशांसाठी दादर स्थानकाहून विशेष लोकल सोडण्यात येईल. त्यासाठी दादरहून दु. ३.४० वाजता ही लोकल सोडली जाईल.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर स. ११.१० ते दु. ४.१०पर्यंत ब्लॉक चालेल. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत स. १०.३४ ते दु. ३.३९ आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. १०.२१ ते दु. ३.४१पर्यंत सेवा खंडित राहील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील.

मध्य रेल्वेवर दिवा स्थानकाकडे सोमवारी १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ६.४०पर्यंत नवीन पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे मंगळवार, १४ ऑगस्ट रोजी काही फेऱ्या रद्द आणि काही अंशत: रद्द करण्यात येणार आहे. त्यासह पनवेल ते दिवा पॅसेंजरदेखील रद्द करण्यात येणार आहे. दिवा ते सावंतवाडी पॅसेंजर दिव्याहून पहाटे ६.२५ वाजता सुटून पनवेलला सकाळी ७.१३ वाजता पोहोचेल.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थनाकात रविवार, १२ ऑगस्ट रोजी स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील. यावेळी काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *