बीड जिल्ह्यातल्या परळीत तब्बल २१ दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलन तात्पुरतं मागं घेण्यात आलंय. सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळं ३० नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. मान्य झालेल्या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही तर १ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा परळीच्या मराठा आंदोलकांनी दिलाय.