आजीच्या अनैतिक प्रेमसंबंधात निष्पाप नातीचा बळी

नाशिकच्या पंचवटी परिसरात अनैतिक प्रेमसंबंधातून एका निष्पाप जीवाचा बळी गेलाय. आजीच्या प्रेमापोटी नातीला जीव गमवावा लागलाय. मायलेकी मृत्युशी झुंज देतायत. त्यामध्ये नऊ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्देवीरीत्या मृत्यु झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्यात..त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

अनैतिक प्रेमसंबध

हे कुटुंब अवघ्या दोन दिवसांपूर्वी पंचवटी मधील कालिका परिसरात  भाडेतत्वावर राहायला आले होते. यामध्ये संगीता देवरे, प्रीती शेंडगे आणि नऊ महिन्याची चिमुरडी सिद्धी शेंडगे अवघ्या दहा बाय बाराच्या खोलीत राहायला होते. देवरे या महिलेशी जलाल उद्दिन खान या इसमाचे अनैतिक प्रेम संबंध असल्यानं तो त्या ठिकाणी कायम स्वरूपी वास्तव्य करण्याचा आग्रह धरत होता. मात्र देवरेला या महिलेने यासाठी विरोध केल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. यामध्ये संशयित दलाल उद्दिन खान याने या तिघांवर रॉकेल टाकून पेटवून  फरार झाला.

चिमुरडीचा मृत्यू 

मात्र याबाबत पोलीस तपासात प्रेमसंबंधातूनच हा प्रकार झाला असून  पंचवटी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्हीही महिलांची प्रकृती गंभीर असून त्या ८० टक्के जळल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेत अवघ्या नऊ महिन्याच्या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *