धु धु धुतलं…प्रेयसीला भेटायला गेला अन् चुकीच्या घरात घुसला

तिला भेटण्यासाठी तो प्रचंड आतुर झाला होता. तिच्या घरी दोघे पहिल्यांदाच भेटणार होते. त्याने चोरासारखा लपून-छपून घरात प्रवेश केला. तिच्या खोलीच्या दिशेने पावले टाकत असतानाच घर मालकाच्या आवाजाने त्याची पावले अडखळली. घर मालकाने त्याची चौकशी केली तेव्हा आपण प्रेयसीला भेटण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. थोडयाचवेळात त्याला आपण प्रेयसीच्या नाही तर चुकीच्या घरात प्रवेश केल्याचे समजून चुकले.

घर मालकाचा आवाज चढल्याने आसपासचे शेजारी सुद्धा तिथे जमा झाले होते. त्या सर्वांनी मिळून या युवकाला चोप दिला. आली चुकी मान्य करुन त्याने माफी देखील मागितली. पण शेजाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पंजाबच्या डेराबस्सी भागात ५ ऑगस्टला फ्रेंडशिपच्या डे च्या दिवशी ही घटना घडली.

हा युवक पहिल्यांदाच त्याच्या प्रेयसीच्या घरी जाणार होता. प्रेयसीने त्याला फोनवरुन कसे यायचे ते समजावून सांगितले होते. पण तो दिशा भरकटला आणि त्याने चुकीच्या घरात प्रवेश केला. पोलीस स्टेशनमध्ये युवकाने आपली चूक कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *