अल्पवयीन मुलींवरील बलात्काराबद्दल फाशी

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. त्यानुसार अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय देण्याचे उद्दिष्ट आहे.

कायद्यामध्ये सज्ञान स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद असली तरी १२ किंवा १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्हती. ती उणीव भरून काढून गुन्हेगारांवर वचक बसावा या हेतूने हे विधेयक संमत करण्यात आले. या विधेयकानुसार १६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद १० वर्षांवरून २० वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच ती दोषीच्या उर्वरित आयुष्यभरासाठी लागू करता येऊ शकते. १६ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्काराबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा असेल.

१२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद २० वर्षे केली असून सामूहिक बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *