अंधेरी पूल दुर्घटना;दुसऱ्या जखमीचा मृत्यू

अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे अंधेरी-डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. राजेश बिल्डर्स या कंपनीद्वारे त्यांनी पालघर, बोईसरमध्ये गृहसंकुलांची उभारणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *