गेले अनेक महिने राज्यात चर्चत असलेल्या सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेला अखेर गणेशोत्सवाचा मुहूर्त राज्य सरकारने निवडला आहे. एक जानेवारी 2016 पासून वेतन आयोग लागू होत असल्याने यामधील अरियर्समधील काही भाग हा गणेशोत्सवच्या काळात थेट कर्मचा-यांच्या पगारात जमा होणार आहे. यामध्ये प्रथम श्रेणी कर्मचारी यांना एक लाख रुपये, द्वितीय श्रेणी कर्मचारी यांना 75 हजार, तृयीय श्रेणी कर्मचारी यांना 50 हजार तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना 25 हजार रुपये हे अरियर्सचे दिले जातील.
दिवाळीपासून प्रत्यक्ष हा सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजेच दिवाळीच्या महिन्यापासून प्रत्यक्ष वाढीव पगार हा कर्मचा-यांच्या खात्यात जमा होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करतांना आधीच खडखडाट असलेल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा थेट भार पडणार आहे.