इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या आंतराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच परदेशी मुलींसह अन्य नऊ जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे. अलिबागमधल्या रेडीसन ब्लू या पंचतारांकीत हॉटेलवर छापा टाकून तीन परदेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर मुंबईतल्या विविध भागातून आणखी सहा जणांना तब्यात घेतलं आहे. यात दोन परदेशी मुली आणि एका भारतीय महिलेचा समावेश आहे.
या सर्व महिला दक्षिण अमेरीकेतल्या कोलंबियातून भारतात पर्यटनासाठी आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सर्वांना अलिबागच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पाचही परदेशी मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.