सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्र्यातील कौसा परिसरात राहणाऱ्या शाबीरअली चौधरी (२६) याच्याशी नसिमाखातून हिचा विवाह झाला होता. लग्नानंतर तीन ते चार महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र नंतर या दाम्पत्यामध्ये खटके उडू लागले. सासू, सासरा आणि पती तिला शिवीगाळ करत असत. तसेच माहेरच्याशी बोलण्यासही मज्जाव करत होते. तसेच सासरचे तिला किरकोळ कारणावरून मारहाण करत तिच्याकडे पैशाची मागणी करत होते. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या नसिमाखातून हिने १८ जुलै रोजी राहत्या घरातच घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी नसिमाखातून हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पती शाबीरअली, सासू अमीरुनीसा चौधरी (५२) आणि सासरा जुबेर अहमद चौधरी यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *