लग्नाच्या आमिषाने युवतीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. संशयित युवक ताराराणी चौक परिसरातील आहे. पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरी आणि निपाणी येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. हा प्रकार संशयित युवकाच्या घरी समजला. त्यावेळी युवकाच्या आईने जातिवाचक शब्द वापरून लग्नाला विरोध केला. त्याच्या बहिणीने रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासही विरोध करून कागदपत्रे देण्यास नकार झाला. संबंधित युवतीला आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवकासह त्याची आई व बहिणीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *