पावसाची विश्रांती; पश्चिम रेल्वे सुरळीत

मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कालपासून पूर्ण विश्रांती घेतल्यानं येथील जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. वसई-विरारमध्ये साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

सोमवारपासून सलग दोन दिवस तुफान बरसलेल्या पावसानं मुंबई, ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवर झाला. विरार-नालासोपारा स्थानकांतील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं बोरीवली ते विरार-डहाणू रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ही वाहतूक तब्बल ४८ तासांनंतर सुरळीत झाली आहे.

लोकल ठप्प झाल्यानं भाईंदरपासून ते विरारपर्यंतचे चाकरमनी घरात अडकून पडले होते. तीन दिवस त्यांना सक्तीची रजा घ्यावी लागली. आज लोकल पूर्ववत झाल्यानं ते घराबाहेर पडले आहेत. कालपर्यंत भाईंदर ते विरार दरम्यान अतिशय संथगतीनं धावणाऱ्या लोकल आता वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *