वसईतील चिंचोटी धबधब्याजवळ ४० जण अडकले

वसईतील चिंचोटी धबधब्याजवळ मुसळधार पावसामुळे ४० जण अडकल्याची घटना शनिवारी घडली. यातील ३५ जण सुरक्षित असून पाच जणांचा शोध सुरु आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये शनिवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून याचा फटका वसईतील चिंचोटी धबधब्यावर गेलेल्या नागरिकांना बसला आहे. चिंचोटी धबधब्यावर गेलेले ४० जण पावसामुळे अडकून पडले. यातील ३५ जणांनी आजूबाजूच्या झाडांच्या आधारे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. तर ५ जणांचा शोध सुरु आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ३५ जणांची सुटका केली असून ५ जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

आत्ता मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या चिंचोटी धबधब्यावर १०० ते १२० लोक आलेले होते, ९७ लोकांना वाचवण्यात आलेले आहे, १२ लोकांना वाचवण्याचे काम चालू आहे.एक पुरुष मृतदेह हाती लागला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही बहुतेक लोक हे मुंबईचे असल्याचे समजून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *