पृथ्वीसारख्या दिसणा-या नव्या ग्रहाचा शोध

पृथ्वीसारख्या दिसणा-या नव्या ग्रहाचा शोध

पृथ्वीसारखाच दिसणा-या नव्या ग्रहाचा शोध लागल्याची घोषणा नासाने केली आहे. केपलर ४५२-बी या नव्या ग्रहाचा शोध लावण्यात नासाच्या यानाला यश मिळाले आहे.

हा ग्रह पृथ्वीपासून १४०० सौरवर्ष दूर आहे. तसेच या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा ६० टक्क्यांनी अधिक मोठा आहे. पृथ्वीप्रमाणेच या नव्या ग्रहालाही स्वत:चा सूर्य आहे. हा ग्रह सिग्नस या तारकासमूहात आहे. या ग्रहावरील तापमान ना अधिक उष्ण आहे ना अधिक थंड आहे. त्यामुळे या ग्रहावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने ग्रहाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

या ग्रहावरील सृष्टीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही मात्र या ग्रहाचा पृष्ठभाग खडकाळ आहे.पृथ्वीपेक्षा हा नवा ग्रह पाचपट मोठा आहे.

सूर्यमालेतील बाहेरच्या ग्रहांचा शोध घेण्यात नासाला मिळालेले हे यश एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नासाच्या स्पेस टेलिस्कोप केपलरने या नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. २००९ मध्ये नासाने केपलरचे प्रक्षेपण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *