‘त्या’ दिवशी इंद्राणी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती

इंद्राणी व तिच्या साथीदारांनी शीना बोरा हिची हत्या केली त्याचदिवशी सकाळी ती ब्युटी पार्लरमध्येही गेली होती, असे ब्युटी पार्लरची मालक असलेल्या अॅन्जेला चुंग यांच्या साक्षीतून नुकतेच उघड झाले.

शीना बोरा हत्या खटल्यात सीबीआय न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्यासमोर चुंग यांची साक्ष नोंदवण्यात आली. ‘इंद्राणी आपल्या पार्लरमध्ये १०-१२ वर्षांपासून येत होती. २४ एप्रिल २०१२ या दिवशीही ती सकाळी १०.३०च्या सुमारास अपॉइंटमेंटप्रमाणे आली होती आणि जवळपास दीड तास पार्लरमध्ये होती. तिने हेअर कलर, थ्रेडिंग, नेल पेंट अॅप्लिकेशन असे विविध प्रकार करून घेतले’, असे चुंग यांनी बचावपक्षाच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तेव्हा, साक्षीत इतका तपशील सांगण्याची आवश्यकता नाही, असे न्या. जगदाळे म्हणाले. मात्र, हा प्रश्न विचारण्यामागे विशिष्ट उद्देश होता, असे सांगत चुंग यांनी जे काही सांगितले आहे, ते नोंदीवर घेण्याची विनंती वकिलांनी न्यायाधीशांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *