कमरेला कट्टा लावून लेडी डॉनची दहशत, विरोध करणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडलं

कमरेला कट्टा लावून लेडी डॉनची दहशत, विरोध करणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडलं

जमिनीचा ताबा घेण्यासाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर थेट ट्रॅक्टर चढवला. उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये हा धक्कादायक आणि थरारक प्रकार घडला. विशेष म्हणजे ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बिजनौरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जमीन आहे. तिचा ताबा घेण्यासाठी स्थानिक गुंडाची पत्नी ट्रॅक्टरवर स्वार होऊन आणि कमरेला कट्टा लावून आली. त्यावेळी तिथल्या महिलांनी तिचा विरोध केला.

परंतु महिलांच्या विरोधाला न जुमनता या लेडी डॉनने ट्रॅक्टर चालवला आणि थेट विरोध करणाऱ्या महिलेला चिरडलं. सुदैवाने त्यातून ही महिला बचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *