पिकांच्या संरक्षणासाठी शेतात लावला काजल अग्रवालचा फोटो

आंध्र प्रदेशच्या एका शेतकऱ्यानं बहरलेल्या पिकांना दृष्ट लागू नये यासाठी शेतात चक्क सनी लिओनीचा फोटो लावला होता. त्यानंतर आता तेलंगणाच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात अभिनेत्री काजल अग्रवालचा फोटो लावला आहे. तेलंगणामधील गोलापल्ली गावातील अन्वर या शेतकऱ्यानं ही नामी शक्कल लढवली आहे. शेतकऱ्याच्या या कल्पनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पीक वाचवण्यासाठी अन्वर यांनी लाल साडीतील काजोल अग्रवालचे दोन पोस्टर शेताच्या बांधावर लावले आहेत. हे पोस्टर लावल्यापासून पीक बहरलं आहे, असा दावा या शेतकऱ्यानं केला आहे. ‘काही दिवसांपूर्वीच मी माझ्या शेतात काजोलचे दोन मोठे पोस्टर लावले आहेत. साहजिकच या पोस्टरकडे लोकांचं लक्ष जात आहे. त्यामुळे येणारे- जाणारे लोक पिकांना नाही तर काजलचा फोटो पाहतात. त्यामुळे वाईट नजरांपासून पिकांचं रक्षण होतं. पोस्टर लावल्यानं पिकं बहरली आहेत,’ असा अन्वर यांचा दावा आहे.

‘गावाजवळ रस्त्यालगत माझी दोन एकर जमीन आहे. त्यात अनेक वर्षांपासून मी भाजीपाला पिकवतो. गेल्या काही वर्षांपासून पिकांचं नुकसान होत आहे. रस्त्यालगत शेती असल्यानं ये-जा करणाऱ्यांची वाईट नजर त्यावर पडते. त्यामुळे पिकांचं नुकसान होतं,’ असंही अन्वर यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *