भांडुप उड्डाणपुलावर अपघात; २ ठार

पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडुप येथील उड्डाणपुलावर आज सकाळी कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले.

ठाण्याच्या दिशेनं कार जात होती. भांडुप येथील उड्डाणपुलावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावरून दुसऱ्या मार्गिकेत गेली. भरधाव कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. या भीषण अपघातात कारमधील पाचपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला.
निहार गोळे (वय २१), चिकू चौधरी (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत शिवगुंडे (वय २१), महेश पद्मनाम (२१), अक्षय मोरे अशी जखमींची नावे आहेत. त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *