इराकमध्ये शिया भागात झालेल्या कारबॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे ७२ जण जखमी झाले आहेत.
राजधानी बगदादमध्ये न्यू बगदादच्या (अल-जदीदा) व्यावसायिक भागात मंगळवारी रात्री झालेल्या कारबॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला. या भीषण स्फोटात ४३ जण जखमी झाले आहेत.
व्यतिरिक्त इसिसने दक्षिण-पूर्व बगदादमध्ये (अल-जफरानिया) झालेल्या अन्य एका कारबॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत.
या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. दोन्ही स्फोट शिया मिलिशिया असाइब अहल अल-हकला लक्ष्य करून केले होते.
दरम्यान, बगदादपासून ५५ किलोमीटर अंतरावर अल-तरमियामध्ये एका सुरक्षा तपासणीस्थळावर झालेल्या स्फोटामध्ये चार सुरक्षा अधिका-यांचा मृत्यू झाला. तर अन्य २० जण जखमी झाले आहेत.

