आईकडून दहा महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून

  मुलगी नको म्हणून तिचा गळा घोटला गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अनेकदा गर्भातच तिचा बळी घेतला जातो पण बिडकीन येथील पैठणखेडा गावात मुलगा नको म्हूणन दहा महिन्याच्या बाळाचा आईने पाण्याच्या ड्रम मध्ये टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच एक मुलगा होता त्यामुळे दुसरं अपत्यं मुलगीचं व्हावी अशी इच्छा महिलेची होती. त्यामुळे २ मुलं असल्यावर पुढे मुलींसाठी घरचे लोक नाही म्हणतील म्हणून एका चिमुकल्याचे आयुष्य संपवल्याची तिने कबुली दिली. आरोपी महिला तिच्या वडिलांकडे आली होती रात्री झोपल्यावर चिमुकला प्रेम अचानक घरातुन  गायब झाल्याची तक्रार तिने नोंदवली होती.

ड्रममध्ये चिमुकल्याचा मृतदेह 

अपहरण झाल्याची तक्रार सुद्धा तिने दिली मात्र  पोलिसांना एकूणच परिस्तिथी पाहता संशय आला. श्वान पथकाच्या साहाय्याने पोलिसानी शोध घेतला असता घरातच एका ड्रम मध्ये चिमुकल्या प्रेमाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घरातील सगळ्यांनाच ताब्यात घेतले आणि त्यानंतर मुलाच्या आईने सगळ्या प्रकार केल्याची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *