नाल्यात पडून १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू

कालपासूनच पावसाचा जोर मुंबई आणि परिसरात पाहायला मिळतोय. सलग सुरू असलेल्या पावसामुळे झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता तितकीच गंभीर घटना समोर येत आहे. मालाड पश्चिम इथल्या ईव्हरशाईन नगरात नाल्यात पडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागेंद्र नागर्जून असे या मृत युवकाचे नाव आहे. साडेअकराच्या सुमारासची दुर्घटना घडली आहे.

मृत घोषित

फायर ब्रिगेडच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. जवळच्या सिद्धार्थ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *