रस्त्यावर पाणी साचल्याने महामार्गावर ७ ते ८ कि.मीच्या रांगा

वसईत गेल्या २४ तासात १८४  mm पाऊस झाला तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने दोन ही मार्गावर ७ ते ८ किलोमीटरच्या रांगा आहेत. किनारा हॉटेल ते घोडबंदर ब्रिज पर्यत ट्राफिक जाम आहे. या भागात अर्धा फूट पाणी जमा झाले आहे. जर असाच पाऊस पडत रहिला तर हा महामार्ग बंद करवा लागेल.

जनजीवन विस्कळीत 

वसईत काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं शहराच्या विविध भागात पाणी साठलंय. नालसोपाराच्या तुलिंज , आचोले , स्टेशन परिसर तर मनवेल पाडा परीसरात पाणी साचू लागले आहे. काही शाळांना निवडणूकीसाठी सुट्टी तर काही शाळा सुरु ठेवण्यात  आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *