रात्रभर झालेल्या पावसामुळे जाणून घ्या मुंबईत कुठे काय आहे स्थिती

मुंबईसहीत उपनगरांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासूनच मध्यरेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरु आहे. आजही दिवसभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानखात्याने व्यक्त केली आहे.

-मुंबईत मागच्या २४ तासात २०० मिमि पेक्षा जास्त पाऊस, सांताक्रूझमध्ये २३१ मिमि पावसाची नोंद.

– कुलाब्यात सकाळी ५.३० वाजेपर्यंत ९० मिमि पावसाची नोंद.

– खार, मालाड, अंधेरी सबवेमध्ये साचले पाणी.

– सांताक्रुजमध्ये मागील २१ तासात १९५ मीलीमीटर पाऊस. दिवसभरात पावसाचा जोर वाढणार.

– पुढच्या १२ तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा स्कायमेटचा अंदाज.

– मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस.

– मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

– सायन, चेंबूरमध्ये सखल भागात साचले पाणी.

– हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात.

– ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये जोरदार पाऊस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *