प्लास्टिकला कडाडून विरोध करत सरकारने महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली. मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक बंद केलं आहे. या प्लास्टिक बंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्यांदाचा प्लास्टिक आठळल्यास 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यसाठी सर्वांनी जवळ असलेलं प्लास्टीक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आहावन करण्यात आलं. असं सगळं असलं तरीही प्लास्टिक बंदीची पहिला विकेट गेली आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
नाशिक शहरात प्लास्टिक बंदी विरोधात पहिला दंड आकारला आहे. हा दंड पाच हजार रुपयांचा असून या व्यक्तीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. नाशिकमधील जुनी पंडित कॉलनीतील रहिवाशावर ही कारवाई झाली आहे. या पावतीत प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्याबाबत ही कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे.
