२० अब्ज युनिट विजेची बचत

एअर कंडिशनरसाठी लवकरच किमान तापमानाची मर्यादा करण्याचा निर्णय केंद्रीय उर्जा मंत्रालयानं घेतलाय..  यापुढे २४ अंशांच्या खाली एसीचं तापमान आणता येणार नाही. एसी तयार करणाऱ्या कंपन्यांना डिफॉल्ट सेटींग २४ अंशांवर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. सुरूवातीला ४ ते ५ महिने प्रायोगिक तत्वावर हे राबवले जाणार आहे. त्यानंतर देशभर हा निर्णय लागू केला जाईल.

२० अब्ज युनिट विजेची बचत

मानवी शरीराचं तापमान ३६ ते ३७ अंशांवर असतं. मात्र बहुतांश कार्यालयं, हॉटेलांमध्ये १८ ते २१ अंश तापमान ठेवलं जातं. यामुळे विजेचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.. हे टाळण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय.. या निर्णयामुळे वर्षाकाठी देशभरात २० अब्ज युनिट विजेची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *