पुण्याहून मुंबईला येणाऱ्या शिवनेरीला अपघात

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शिवनेरी बसला सायन-पनवेल महामार्गावर अपघात झाला आहे. सानपाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सुमारे ११.४५ वाजता हा अपघात घडला. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. त्यापैकी पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून शिवशाही बसला अपघात झाल्याच्या घटना घडल्या. त्यात आज शिवनेरी बसला अपघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *