पुण्यात १५ भटके कुत्रे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

पुण्यात एकाचवेळी १५ भटकी कुत्री मृतावस्थेत आढळली आहेत. हडपसरमधील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडलीय. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *