सुरक्षारक्षकानेच लांबवले एक कोटी

सुरक्षारक्षकाने बंद फ्लॅटचे लॅच उचकटून रोकड आणि सोने-चांदी-हिऱ्याचे दागिने असा एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला. निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकाजवळील पंचवटी बंगल्यात ही घटना उघडकीस आली आहे. घरगुती कार्यक्रमासाठी सर्वजण बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत सुरक्षारक्षकानेच हा प्रकार केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

विनोद राजकुमार अगरवाल (४८, रा. सेक्टर नंबर २३, पंचवटी बांगला, भक्ती-शक्ती चौक, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोविंद कालु परियार (३५, रा. कलाली, लमकी, नेपाळ) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. कुटुंबात लग्न सोहळा असल्याने बरेच दागिने आणि रोकड घरात आणून ठेवली होती. गोविंद हा अगरवाल यांच्या बंगल्यामध्ये सुरक्षारक्षक आणि पडेल ते काम करतो. शनिवारी (१६ जून) रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत गोविंदने विनोद यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट आणि त्यांचा भाऊ संदीप यांचा दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे लॅच तोडूत चोरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *