जावायाने घेतला सासऱ्याच्या नाकाचा चावा

माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येत नसल्याने संतापलेल्या जावयाने रागाच्या भरात सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतला. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील भादा येथे घडला. याप्रकरणी जावायाविरोधात भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष यादव असे जावयाचे नाव असून त्याने सासरे नागनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला. माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येत नव्हती. संतोष पत्नीला सातत्याने मारहाण करत असल्याने ती वैतागून मुलांसह माहेरी गेली होती. तिला नेण्यासाठी भादा येथे आल्यानंतर त्याचा पत्नीशी वाद झाला. त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. मुलीला मारहाण होताना पाहून नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संतोषने नागनाथ यांच्या नाकाचा कडकडून चावा घेतला. यामध्ये त्यांच्या नाकाचा तुकडा पडला असून ते जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर नागनाथ शिंदे यांनी जावयाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर भादा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *