बहुतेक माझ्या नशिबात स्त्री, पुरूषाचे प्रेमच नाही. ठिक आहे. पुन्हा एकदा एखाद्या चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा हे बरे. कटू असले तरी हे सत्य मी स्वीकारेन. एखाद्या पुरूषाने मला दु:ख पोहोचवावे याला मी कधीही मान्यता देणार नाही, अशी भावना अभिनेत्री मनिषा कोईराला हिने व्यक्त केली आहे. मनिषाने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी यशस्वी लढा दिला. सध्या ती अभिनेता संजय दत्तच्या जीवानावर आधारीत ‘संजू’ या चित्रपटातून संजय दत्तची आई नर्गिस दत्तच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
परमेश्वराने मला नवी संधी दिली
मनिषा कोईरालाने म्हटले आहे की, ‘माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे की, मी कोणतेही चुकीचे पाऊल टाकू शकत नाही. परमेश्वराने मला पुन्हा एकदा नवी संधी दिली आहे’. आपल्या भावाना व्यक्त करताना मनिषा सांगते, ‘माझे जग वेगळेच झाले होते. पण, जीवनात आलेल्या संघर्ष आणि अनुभवाने मला पुन्हा एकदा नवी संधी दिली. मला अधिक समजदार आणि सहनशील बनवले. तुमचे जिवन जेव्हा धोक्यात असते तेव्हा, तुम्हाला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळतो. ते दु:ख त्या वेदना या दुसऱ्यांदा जगने कठीण होते. नर्गिस यांची भूमिका साकारण्यासाठी आत्मिक शक्तीची गरज आहे. त्यांचे मोठे व्यक्तिमत्व होते. केवळ त्यांच्यासारखे दिसने किंवा त्यांच्यासारखे वर्तन करने हे त्यांची भूमिका साकारण्यासाठी पुरेसे नाही,’ असेही मनिषा विनम्रपणे सांगते.
संजय दत्तच्या जीवानावर आधारीत ‘संजू’
पुढे बोलताना मनिषा सांगते की, नर्गिस दत्त यांची भूमिका साकारण्यात मला किती यश आले हे लवकरच कळणार आहे. सध्यातरी मी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. मनिषा कोईराला अभिनेता संजय दत्तच्या जीवानावर आधारीत ‘संजू’ या चित्रपटातून संजय दत्तची आई नर्गिस दत्तच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.