पुण्यात मद्यधुंद कारचालकाची दोन दुचाकींना धडक, तीन जण ठार, दोन गंभीर जखमी

पुण्यात मद्यधुंद कारचालकाची दोन दुचाकींना धडक, तीन जण ठार, दोन गंभीर जखमी

पुण्याच्या निगडीजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली ज्यात 3 तरुण जागीच ठार झाले आहेत. तर उर्वरीत दोन जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी कारचालक मयुर घुमटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघाताच्यावेळी मयूर दारुच्या नशेत असल्याचं बोललं जात आहे. काल रात्री एक वाजेच्या दरम्यान हे पाचही जण चहा पिण्यासाठी आले होते. त्यानंतर तिथून परतत असताना पांढऱ्या रंगाच्या कारने या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघातात मृत पावलेले तीनही तरुण हे निगडीजवळच्या आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतले विद्यार्थी होते.

सध्या वैद्यकीय चाचणीसाठी कारचालक मयुर पोलिसांच्या ताब्यात असून अहवाल आल्यानंतर याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.

मृतांची नावे:

1. किरण दहाने:  सातारा

2. शुभम भालेकर: पारनेर अहमदनगर

3. संकेत समेळ: खोपोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *