दीरासोबत पळाली ३ बाळांची आई, गावकऱ्यांनी मुंडन करुन फिरवलं गावभर

झारखंडमधील चतरा पोलीस ठाणे क्षेत्रात रविवारी गावकऱ्यांनी एका प्रेमी युगूलाचे मुंडन करून त्यांना गावभर फिरविले. या प्रेमी युगुलांच वहिनी आणि दीर असं नात आहे. याप्रकरणी पिडितेने गावातील ७ जणांविरूद्ध प्राथमिक तक्रार केली आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून आरोपींना पकडण्यास सुरूवात केली आहे. एका तरुणाचं आपल्या भावाच्या बायकोसोबत प्रेमप्रकरणं सुरू होतं. साधारण ६ महिने यांच नात सुरू होतं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वहिनी पतीला सोडून दीरासोबत पळून गेली. ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळीकडे दोघांची शोधाशोध सुरू झाली. गावकऱ्यांचा राग अनावर होत गेला. लग्नाच्या काही महिन्यांनंतर शनिवारी हे दोघे पुन्हा परतले.

पंचायतीचा निर्णय 

ते दोघे गावात येताच गावकऱ्यांनी पंचायत बोलावली. या दोघांचे मुंडन करून गावभर फिरवायचे असा निर्णय गाव पंचायतीने दिला. निर्णयानुसार रविवारी सकाळी दोघांना गावच्या मध्यभागी आणण्यात आले. मुंडन करून पूर्ण गावभर धिंड काढण्यात आली. या महिलेला ३ मुलं आहेत. मुंडन केल्यानंतर दोन्ही पिडित पोलीस स्थानकात पोहोचले आणि पोलिसांना याची माहिती दिली. यावरून ७ जणांविरूद्ध आणि काही अज्ञातांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *