पॉर्न पाहून १४ वर्षीय मुलाचा १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार; प्रेग्नंट

केवळ भावा-बहिणीच्या नात्यालाच नव्हे तर, संपूर्ण मानवतेलाच काळीमा लागेल अशी घटना नवी मुंबईतील कामोठे परिसरात घडली आहे. इथल्या एका १४ वर्षीय मुलाने १६ वर्षाच्या आपल्याच बहिणीवर बलात्कार केला आहे. पॉर्नच्या आहारी जाऊन भावाने केलेल्या या कृत्यामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून, त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.

एकांताचा गैरफायदा घेऊन बहिणीवर अत्याचार..

कामोठे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन जडले होते. आरोपी गेले काही दिवस पॉर्नच्या इतका अहारी गेला होता की, तो तासनतास पॉर्न पाहात बसायचा. व्हिडिओ पाहून उत्तेजीत झालेल्या आरोपीने आपल्या बहिणीसोबतच घाणेरडे कृत्य केले. काही दिवसांपूर्वी आई वडील गावी गेले होते. त्यामुळे मिळालेल्या एकांताचा गैरफायदा घेत आरोपीने आपल्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केला. त्याला जेव्हा संधी मिळत असे तेव्हा तो बहिणीवर अत्याचार करत असे.’

घडल्या प्रकाराने कुटुंबियांना धक्का

दरम्यान, एक दिवस पीडितेला आरोग्यासंबंधी तक्रारी अचानक सुरू झाल्या. पीडितेची आई पीडितेला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या असता पीडिता गर्भवती असल्याचे पुढे आले. या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबीयही हबकून गेले. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेचे योग्य पद्धतीने समुपदेशन केल्यावर तिने अत्याचाराबाबत माहिती दिली. घडला प्रकार ऐकून सुन्न झालेल्या आईने पोलिसांना माहिती दिली आणि भावाला अटक करायला लावली.

आरोपी तासनतास पॉर्नच्या जाळ्यात

प्राप्त माहितीनुसार, कामोठे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपीला सात जूनला अटक केली आहे. तसेच, पुढील तपासही सुरू केला आहे. पीडिता आणि आरोपीचे आई-वडील नोकरी करतात. त्यामुळे बहुतांश वेळ हे लोक घराबाहेर असतात. तर, पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही नात्याने भाऊ-बहिण असून कामोठे गावातील शाळेमध्ये जातात. आरोपी पॉर्नच्य इतका आहारी गेला होता की, तो घरात कोणी नसले की, सतत पॉर्न बघत बसायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *