मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली.. ठाण्यातही पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे.. विकेंडला मान्सून मुंबईत दाखल झाल्यानं उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान, येत्या २४ तासात मान्सून राज्यभर दाखल होणार असा अंदाज हावामान खात्यानं व्यक्त केलाय.
पावसाचा मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गावर परिणाम झालेला अद्याप दिसून आलेला नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू आहे.
नागरिकांनो, थोडा फार उशीर झाला तरी चालेल पण सुरक्षित प्रवास करा… कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अगोदर बातम्यांमधून पावसाची अपडेट घ्या… मगच तुमचा दौरा प्लान करा… स्वत:ची काळजी घ्या, असं आवाहन करत आहे.
