शाहरूखची बहीण पाकमधून निवडणूक लढवणार

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याची चुलत बहीण नूर जहाँ ही पाकिस्तानातून निवडणूक लढवणार आहे. येत्या २५ जुलै रोजी पाकमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून नूर जहाँ यांनी पेशावरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

नूर जहाँ यांनी पाकिस्तानातील ‘जिओ न्यूज’शी बोलताना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. ‘शाहरूख खानला जेवढा पाठिंबा मिळतो, तेवढाच पाठिंबा मला मिळेल अशी आशा आहे,’ तिने व्यक्त केली. पेशावरमधल्या खैबर पख्तूनवा प्रांतातील pk-77 जागेवरून त्या निवडणूक लढवणार आहेत. त्या पेशावरच्या मोहल्ला शाहवाली कतल येथे राहतात. निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर करण्याच्या आधीपासूनच त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. नूर जहाँ गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे. अपक्ष म्हणून सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या नूर यांना त्यांच्या शेजाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांना आगामी काळात महिला सक्षमीकरणावर काम करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *