‘बॉम्बे वेलवेट’साठी करण जोहरला दिलं फक्त ११ रुपयांचं मानधन

तीन वर्षांपूर्वी १५ मेला ‘बॉम्बे वेलवेट’हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. इतिहासाचार्य ज्ञान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ पुस्तकावर आधारित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती अनुराग कश्यप यानं. १९६० नंतर मुंबई शहराची आंतरराष्ट्रीय महानगर होण्याकडे वाटचाल कशी सुरू झाली, ग्लॅमर, गुन्हेगारींच्या साखळीत अडकलेल्या मुंबईचं चित्र या चित्रपटातून दाखवलं होतं. त्या काळची मुंबई रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा या चित्रपटासाठी खर्च करण्यात आला होता. साधरण १२० कोटींचं बटेज असलेल्या या चित्रपटाला ५० कोटींचाही गल्लाही जमावता आला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानं प्रथमच अभिनयात पदार्पण केलं होतं त्यासाठी त्याला फक्त ११ रुपयांचं मानधन दिलं होतं.

खरं तर चित्रपटासाठी कलाकार कोट्यवधींचं मानधन घेतात मग करणनं इतकं कमी मानधन का आकारलं होतं? असा प्रश्न अनेकांना तेव्हा पडला होता. या चित्रपटाचं बजेटचं इतकं होतं की त्यात मला माझं मानधन सांगून आणखी खर्च वाढवायचा नव्हता. म्हणूनचं मी क्षगूनचे ११ रुपये दे इतकंच अनुराग कश्यपला सांगितलं होतं असं करण म्हणाला.

मी वाईट अभिनय करतो असं अनेक जण म्हणतात, मला चित्रपटात काम करायचं होतं उभ्या आयुष्यात मला कोणी खलनायकाची भूमिका देईल असं मला तरी वाटत नाही म्हणूनच ही भूमिका निवडताना मानधन न घेण्याचं ठरवलं असं करण मस्करीत म्हटला होता. या चित्रपटात करणनं कैझाद खंबाटा या खलनायकाची भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *