केजरीवालांविरोधात दिल्ली पोलिसांची तक्रार

केजरीवालांविरोधात दिल्ली पोलिसांची तक्रार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलिसांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात केजरीवालांनी पोलिसांचा ‘ठुल्ला’ असा उल्लेख केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.

एका वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान दिल्लीतील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करताना केजरीवालांनी हा उल्लेख केला होता. त्यामुळे पोलिसांचा अपमान आणि बदनामी झाल्याची भावना पोलिसांमध्ये आहे.

परिणामी दोन पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या असून वरिष्ठ अधिका-यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *