लग्न मंडपाच्या बाहेर कंटेनरनं १५ जणांना चिरडलं

भंडाऱ्यात कंटेनरने पंधरा जणांना चिरडलंय. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय. लाखनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा इथं असणाऱ्या एका मंगल कार्यालयासमोर हे सगळे लोक उभे होते. यावेळी या कंटेनरने या सगळ्यांना चिरडलंय.

या दुर्घटनेत दहा ते बारा जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *