काम अपूर्ण असल्यामुळे आणखी काही काळाची प्रतिक्षा
केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पा अंतर्गत मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा अशी सागरी माग्रे रो – रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडवा येथे टर्मिनल बांधण्यात टर्मिनल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होवून १ एप्रिल पासून ही रो- रो सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिलेल्या मुदतीत का पुर्ण होऊ शकल्याने रो- रो सेवेचा मुहूर्त टळला आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. त्याच बरोबर पर्यटनच्या दृष्टीने तो महत्वाचा जिल्हा आहे. अलिबाग हे पर्यटन केंद्र आहे. मुंबईहून येथे येण्यासाठी जलप्रवास हाच सोपा मार्ग आहे. गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का – रेवस हे दोन मार्ग आहेत. या मार्गाने येणार्यास पर्यटकांना स्वतचे वाहन घेऊन येणे शक्यं होत नाही. त्यामुळे मुंबई – मांडवा अशी रो – रो सेवा सुरू करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात होती.
केंद्र शासनाच्या सागरमाला योजनअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्रक मेरीटाईम बोर्ड) हे काम करत आहे. १३५ कोटी २९ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यरता मिळाली होती . जुल २०१६ मध्ये या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मांडवा येथील रो- रो टर्मिनलमध्ये २१४ बाय १० मीटरची जेट्टी , ३० बाय ३० चा प्लॅटफॉर्म, २० बाय २० मीटरचा तरंगता तराफा (फ्लोटिंग प्लांटून ) ३६० मीटर लाटरोधक भिंत (ब्रेकवॉटर ) आणि वाहन तळ बांधण्यात येत आहे. कामाची मुतद जुल २०१८ पर्यंतची असली तरी हे काम मार्च अखेर पर्यंत पुर्ण होईल आणि एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून मुंबई ते मांडवा दरम्यान रो रो सेवा सुरु होईल असा विश्वास केंद्रीय जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता. मात्र मांडवा येथील जेटीचे काम रखडल्याने रो रो सेवा सुरु होण्यासाठी आणखिन काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मांडवा जेटी जवळील समुद्र खोलीकरणाचे काम आणि जेटी जोडणारया रस्त्याच्या भरावाचे काम अद्याप पुर्ण झालेल नाही. तरंगता तराफ्याचे काम अद्याप पुर्ण झालेल नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत रो रो सेवेचा आनंद लुटण्यासाठी प्रवाश्यांना आणखिन काही काळ वाट पहावी लागणार आहे.
प्रकल्पाचे फायदे..
मांडवा – भाऊचा धक्का अशी रो – रो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईहून अलिबागला स्वतचे वाहन रो रो सेवेने घेऊन येणे शक्या होणार आहे. सध्या प्रवासी किंवा पर्यटकांना पनवेल मार्ग यावे लागते. हा वळसा चुकणार आहे. याशिवाय मांडवा ते गेटवे अशी जी बोटसेवा सुरू आहे ती बारमाही होवू शकणार आहे यामुळे केवळ अलिबाग किंवा मुरूडच्यालच नव्हेा तर संपूर्ण कोकणच्याध पर्यटनाला चालना मिळू शकणार आहे. राज्यात प्रथमच सुरु होणारया या प्रकल्पाची रायगडकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘रो रो टर्मिनलचे काम दिवस रात्र सुरु आहे. टर्मिनलला जोडणारया मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले. गाळ काढण्याचे काम सात ते आठ दिवसात पुर्ण होण अपेक्षित आहे. ही कामे पुर्ण झाली की रो -रो सेवा कार्यान्वयित होऊ शकले.’ – अनिल शिंदे, बंदर निरीक्षक मांडवा.
‘रो -रो सेवा एप्रिल महिन्यात सुरु होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप काम पुर्ण झालेले नाही. मे महिन्यात ही सेवा कार्यान्वयित झाली. तर पावसाळ्यानंतरच सेवा सुरु करता येई शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सेवेमुळे मांडवा ते अलिबाग दरम्यान वाहनांची वरदळ वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण गरजेचे आहे.’
