अंत्यविधी करून परतताना कारला अपघात, दोन जणांचा मृत्यू; चार जखमी

डिस्कळ येथील नातेवाइकाच्या अंत्यविधीवरुन परत येताना कार ओढ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले. हा अपघात फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीतील पालखी तळाजवळ भोवर ओढ्याच्या पुलावर पहाटे दोनच्या सुमारास झाला. मृत पाडेगाव व जेऊर येथील आहेत. जखमीना लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३,  रा. मांडकी ता. पुरंदर) व शोभा नंदकुमार धुमाळ (४५, रा. पाडेगाव ता. फलटण) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, पाडेगाव व जेऊर येथील धुमाळ कुटुंबीय नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी कार (एएम १२ एच झेड ७७२७) ने बुध, डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना त्यांची गाडी लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगाव गावच्या हद्दीत पालखी तळाजवळील आली असता कठड्याला धडकली. यामध्ये चालक संजय धुमाळ व शोभा धुमाळ हे ठार झाले. तर सारिका संजय धुमाळ, कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांचावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *