नाशिकमध्ये रुग्णालयातून गर्भवती कैदी फरार

नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातून गर्भवती कैदी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. सायदा शफिक पठाण असं मालेगावची रहिवासी असलेल्या या कैदीचं नाव आहे.

नाशिक मध्यवर्ती कारागृहात ती होती. खुनाचा आरोप असलेल्या सायदा पठाण प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, रुग्णालयातून संध्याकाळच्या सुमारास ती फरार झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *