पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणीचा हृद्यविकाराने मृत्यू

सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका २० वर्षीय तरुणीचा पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना हृद्यविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कोमल दत्तात्रय पवार असं युवतीचं नाव आहे. शुक्रवारी बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करताना कोमल चक्कर येऊन कोसळली. त्यामुळे मैदानावर सराव करणाऱ्या अन्य खेळाजूंनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. कोमलचे वडील शेतकरी असून कोमलच्या आकस्मिक आणि दुर्दैवी मृत्यूमुळे पवार कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *