अबब!! १३२ कोटींची नंबर प्लेट

आपल्या गाडीवर स्वत:च्या पसंतीचा नंबर असावा यासाठी लोक लाखभर रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात असं आजवर आपणं ऐकलं असेल. पण एका व्यक्तीने कारच्या नंबर प्लेटवर आवडता नंबर हवा म्हणून एक, दोन नव्हे तर तब्बल १३२ कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली तर नवल वाटायला नको. कारण ब्रिटनमध्ये एका कारवेड्या पठ्ठ्यानं आपल्या कारचा नंबर विकायला काढलाय.

‘एफ-१’ अशा नंबरची प्लेट त्याने विक्रीसाठी काढली असून तिची किंमत १४ मिलियन पाऊंड अर्थात १३२ कोटी रुपये इतकी ठेवली आहे.

‘एफ-१’ नंबर असलेली नंबर प्लेट गेल्या १० वर्षात ब्रिटनमध्ये चांगलीच प्रसिद्ध झालीय. ही नंबरप्लेट अनेक महागड्या गाड्यांवर पाहायला मिळते. या नंबर प्लेटला असलेली मागणी लक्षात घेऊन एका आलीशान कारचे मालक असलेल्या अफजल खान यांनी कारची नंबर प्लेट विकण्याची जाहीरात दिलीय. जाहीरातीत नंबर प्लेटचे विक्रीमूल्य १३२ कोटी ठेवण्यात आलं आहे. खुद्द अफजल यांनी ही नंबर प्लेट काही वर्षांपूर्वी ४ कोटी रुपयांना खरेदी केली होती.

याआधीही दुबईसह इतर देशांमध्ये काहींनी नंबर प्लेटसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, ‘एफ-१’ ही नंबर प्लेट सर्वात प्रसिद्ध असल्याचं मानलं जात आहे. ही प्लेट विकली गेली तर ती जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *