नायजेरीयात बॉम्बस्फोट, ५० ठार

नायजेरीयामध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या लागोपाठ दोन बॉम्बस्फोटामध्ये ५० नागरीक ठार झाले आहेत. योब राज्यातील दामातुरु शहरामध्ये ईदच्या प्रार्थनेसाठी मुस्लिम बांधव मोठया संख्येने जमलेले असताना हे बॉम्बस्फोट झाले.

नायजेरीयन लष्करातील कर्नल सानी उस्मान यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.४० च्या सुमारास दामातुरुमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला यात ४३ नागरीक ठार झाले. त्यानंतर दोनच मिनिटांनी झालेल्या दुस-या बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले. अनेक जण या बॉम्बस्फोटात जखमी झाले आहेत.

दोन आत्मघातकी महिला दहशतवाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले. दुसरा बॉम्बस्फोट दहा वर्षाच्या मुलीने घडवून आणला. स्थानिकांनी बोको हराम या दहशतवादी संघटनेवर बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *