मांसाहार शिजवला म्हणून नाटयनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

मांसाहार शिजवला म्हणून नाटयनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

प्रसिध्द नाटय निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरात मांसाहारी अन्न शिजले म्हणून इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोविंद चव्हाण दहीसरमधल्या ज्या बोना व्हेन्चर इमारतीत रहातात त्यात बहुसंख्या जैन-गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. या इमारतीतील रहिवाशी चव्हाण कुटुंबियांना धमकावत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

रहिवाशी चव्हाण यांच्या दरवाजावर लाथा-बुक्क्यांचा प्रहार करुन असभ्य भाषेत त्यांना धमकावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुरुवारी ही घटना घडली तेव्हा गोविंद चव्हाण घरात नव्हते.

रहिवाशांनी चव्हाण यांच्या पत्नी आणि मुलीला मारहाण केली. गोविंद चव्हाण यांनी ‘यु टर्न’, मदर्स डे, जाऊ द्या ना भाई अशा अनेक यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे. गोविंद चव्हाण यांची कन्या सुप्रियाने फेसबुकवरुन या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *