अवघ्या २६ व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचा मृत्यू

छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण परांजपे याचा अवघ्या २६ व्या वर्षी मृत्यू झालाय.

रविवारी २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास करणच्या आईला त्यांच्या राहत्या घरी करणचा मृतदेह आढळला.

करणच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असलं तरी झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका बसल्यानं करणचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जातेय.

‘दिल मिल गये’ या कार्यक्रमातून करण ‘जिग्नेश’च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. ‘संजिवनी’ या कार्यक्रमातही त्यानं महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसंच अनेक टीव्ही सीरिअल्ससाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून करणनं काम सांभाळलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *