औरंगाबादमध्ये जुन्या वादातून मित्रानेच मित्राला गाडी खाली चिरडलं

धक्कादायक बातमी आहे. जुन्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना औरंगाबादमधल्या कामगार चौकात घडली आहे. संकेत कुलकर्णी असं हत्या झालेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे.

गाडीखाली चिरडून हत्या

संकेतचा मित्रच असलेल्या संकेत जायभायेनं ही हत्या केलीय. एकदा गाडीखाली चिरडून हत्या झाली नाही म्हणून तीन वेळा अंगावरून गाडी घालून जीवे मारण्यात आलं.

भेटण्याच्या बहाण्यानं बोलावलं 

संकेत कुलकर्णी हा पुण्यात शिकत होता. औरंगाबादमध्ये तो आपल्या मावशीकडे आला होता. त्याला संकेत जायभायेनं भेटण्याच्या बहाण्यानं बोलावलं आणि त्याच्या अंगावर गाडी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *