संजय नहार यांनी घेतली जखमींची भेट, आर्थिक मदतीचीही तयारी

कुरिअर पार्सल बॉम्बस्फोटामध्ये ज्या संजय नहार यांच्या नावाने पार्सल आले होते त्यांनी नगरमध्ये येऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस केली.

इतकंच नाही तर, या घटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी खर्चाबाबत जखमींना आर्थिक मदतीची तयारीही दर्शवलीय.

नगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये या स्फोटातील जखमी ‘मारुती कुरिअर एजन्सी’चे कर्मचारी संदीप भुजबळ आणि कर्मचारी संजय क्षीरसागर हे दोघे उपचार घेत आहेत. या प्रकरणात एटीएसने तपास केल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन संजय नहार आज नगरला आले होते.

सरकार कुठलेही असले तरी अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. सरकारला या घटनांकडे गंभीरपणे बघावे लागेल अन्यथा याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा संजय नहार यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *