राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात गेलाय. जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात वासुदेव श्रावण पाटील या शेतक-याचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. वासुदेव पाटील हे शेतात काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. वासुदेव पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर

शरिरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांचा अंत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खान्देशात उष्णतेची लाट आली असून जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *